STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

आईसाठी काहीपण

आईसाठी काहीपण

4 mins
202

     महेश आपल्या छोट्या परिवारासह राहत होता. त्याच्या परिवारामध्ये त्याची आई,वडील वारलेले होते, एक गतीमंद भाऊ,त्याची बायको आणि मुलगा होते. तो मजुरीकरायचा. त्याच गाव म्हटल तर तस पाहायलागेल तर खेडच होत. सगळ छान चालल होत.अचानक कोरोनाची साथ आली. सगळापरिवार जपुन राहायचा. आपली काळजीघ्यायचा. महेश एक दिवस कामावरून घरीआला. तो जरा टेकला, त्याचे चुलते घराशेजारीराहायचे ते आल्यामुळे त्याच्या बायकोनेदोघांना बाहेर चहा दिला. ते बोलत बसले होते.तेव्हा त्याच्या आईची तब्येत अचानक बिघडली.आईला कसतरी व्हायला लागला, महेशधावतच आईजवळ आला. बघीतल तर तिलाश्वास घ्यायला त्रास होत होता. त्याने तातडीनेउपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यातआल. त्यांची टेस्ट केली असता पाॅझिटीव्हआली होती. त्या रूग्णालयात दाखल केलपरंतु तिथे तीन तास पुरेल इतकाच ऑक्सीजनसाठा होता. त्यांची ऑक्सीजन लेवल सत्तरइतकी होती. तेव्हा त्यांना डाॅक्टरांनी तिथुनजिल्हा रूग्णालयात दाखल करण्याचासल्ला दिला. परंतु कोरोना रूग्णसंख्यादिवसेंदिवस वाढत होती. खुप पेशंट्स वाढलेहोते. त्यामुळे सरकारी आणि खाजगीरूग्णालये जी जवळ होती ती सगळी पूर्णभरली होती. अरे देवा ! आता कस करणारमहेश आणि त्याच्या घरच्यांना काही सुचेनासझाल. आईची प्रकृती गंभीर होती. अशीपरिस्थिती उद्दभवली तेव्हा महेशने आईलाऑक्सीजन मिळावा यासाठी ऑक्सीजनयुक्त रूग्णवाहिकेचा शोध घेतला. रूग्णवाहिका मिळाली पण त्यात ऑक्सिजन नव्हता.


कोविडच्या पेशंटची संख्या वाढल्यामुळेतसेच काही ठिकाणचा साठा संपुष्ठात आल्यानेअनेक रूग्णांना ऑक्सीजन न मिळाल्यानेआपल्या जिवाला मुकावे लागले. महेशलाखुप भिती वाटत होती. पण तो खंबीर होता.आईसाठी काहिही करायची त्याची तयारी होती.त्याने धीर सोडला नाही. फक्त त्याचे काकासोबत होते तरी तो खचला नाही. त्यानेत्याच्या मित्राकडून ऑक्सीजन सिलेंडरचीव्यवस्था केली. त्या मित्रानेही देवासारखीअगदी वेळेवर मदत केली. शहरातील खाजगीरूग्णालयात दाखल केले असता त्यांचीपरिस्थिती नाजुक असल्याने डाॅक्टरांनित्यांनी त्यांना तिथुनही दूसर्‍या हाॅस्पिटललाहलवण्याचा सल्ला दिला. महेशने आणित्याचे काका त्यांना मोठ्या खाजगी रूग्णालयातदाखल केले. ते फिरत होते पण बेडच मिळतनव्हता. पण नशीब महेशने आपल्या आईसाठीबेड मिळाल्याचे देवाला आभार मानले.         


महेशच्या आईंना हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांचे काका त्यांना ताप वगैरे आल्याने त्यांची टेस्ट पाॅझिटीव्ह आली असता मदत करणारेही कुणी नव्हते आता, फक्त एकटा महेशहे सगळ हाताळीत होता. त्याच्या एकट्यावरआईची जबाबदारी येऊन पडली. त्यालाफक्त आईची काळजी होती. ती वाचलीपाहीजे. तो खुप टेन्शनमध्ये होता. कुणीहीनातेवाईक येऊ शकत नव्हता. आधीच कोरोनाला सगळे घाबरत होते. आईचा सिटीस्कॅन केला त्यामध्ये सत्तर टक्के इंन्फेक्शन झाल्याची माहीती समोर आली. डाॅक्टरांनी महेशला बोलवून सगळे केलेलेरिपोर्टस बद्दल त्याला सांगीतलं. डाॅक्टरांनीबारा तासांची मुदत दिली. महेश खुप घाबरलाहोता. त्याने स्वतःलाच सावरल. उपचार होतीलपरंतु त्यासाठी खर्च लाखो रूपये येईल डाॅक्टरांनीसांगितल असता, महेशने डाॅक्टरांना म्हटल." डाॅ, तुम्ही पैशाची काळजी करू नका, तुम्ही तुम्हांला जे उपचार करायचे करा.मला फक्त माझी आई बरी झाली पाहीजे हो.. " माझ्यासाठी तिच महत्वाची आहे.महेशने सांगितल्यावर त्याच्या आईवरतिथे उपचार सुरू झाले. महेशने इकडून

तिकडून पैसेही जमवले आणि त्याने एकादिवसात आपल्या आईसाठी पैसे व्याजाने काढले.


कारण त्याच्याकडे एवढे पैसे नव्हतै.अस काही झाल असेल कींवा होईल याची त्याला कल्पनाही नव्हती. हे अस सगळ अचानक आईला झाल. तो मजुरी करणारामहेश खर्चाची पर्वा न करता त्याने पैसे व्याजाने घेतले आणि आईच्या ट्रिटमेंट साठीखर्च केले. आईवर आठ दिवस उपचार सूरूहोते. आईही उपचारांना प्रतिसाद देत होत्या.आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पणघरी गेल्यानंतर ही आईंना ऑक्सीजन सूरूठेवावा लागेल सांगितल असता महेशने त्याचीही व्यवस्था आपल्या घरी केली.आठ दिवसांत आई मृत्युच्या धाढेतुन परत आल्या होत्या. त्यांना बर वाटत होत.डिस्जार्ज देण्यात आला. मेडीसीन आणिइतर सगळाच खर्च साडेतीन लाख रूपयेझाला. महेशने आईसाठी ऑक्सीजन मशीन घरी आणल. ते त्यांना डाॅक्टरांनीसांगितल्याप्रमाणे लावत होते. आईंनाआता आराम मिळाला होता. त्यासाठीऑक्सीजनसाठी त्यांना दोन हजार रूपयेद्यावे लागत होते. घरी आल्यावर महेशचीबायकोही आईंकडे लक्ष देत होती. त्यांचआजारपणात सगळच करत होती. त्यांचीघरीही योग्यप्रकारे काळजी घेतली जात होती.    


आई बरी होत होती, तसेच खर्चही झालाहोता आणि रोजही लागत होता. पण महेशलात्या पैशापैक्षा आई बरी झाली ही त्याच्यामनाला बर वाटल. समाधान वाटल. पैशाचीपर्वा त्याने केलीच नाही आईवर उपचारचालू ठेवले. पैशाचा बोजा वाढत होता,त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.तो घरात एकटा कमावता होता. सगळकुटुंब तो एकटा सांभाळत होता. तरीही त्याने आपल्या जन्मदात्रीसाठी पैशाकडे पाहीले नाही. स्वतःवर कर्जाचा डोंगर चढवत महेशने आपल्या कोरोनाबाधीत आईला मरणाच्या दारातुन सुखरूप घरी आणल होत. आई बरी झाली हेच त्याच्यासाठी खुप महत्वाच होत. आईची आपल्या आयुष्यातील जागाकुणीही घेऊ शकत नाही. तिच्याइतक प्रेमआणि माया कुणीही करू शकत नाही.आईमुळे आपण आहोत, तिच्यामुळे हे जग पाहतो. ती आपल्या लेकरांसाठी काहीहीकरू शकते मग आपण का नाही करू शकत? म्हणूनच महेशने हे सगळ केल. तिचे आपल्यावर अनंत उपकार असतात.पण जेव्हा तिला म्हातारपणी आपल्या आधाराची गरज असते. तिचे ऋण फेडण्याची एक संधी असते. अनेक लोक असे आहेत की पैशाचा आधी विचार करतात पण महेशने आपल्या आईच्या प्रेमापोटी त्यांनीविचारच नाही केला. महेशने संयमाने सगळीपरिस्थीती सांभाळून, आपल्या आईलाही धीर देत, आईला कोरोनावर मात करीत बर केल. तिची काळजी घेतली. तिला मृत्युच्या दारातून वाचवल. आपल्या आईला सुखरूप घरी परत आणलं... सकारात्मकता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कोरोनासारख्या आजारावर  सहजपणे मात करता येते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy