आईबाबा तुझे नि माझे - भाग 1
आईबाबा तुझे नि माझे - भाग 1


असं म्हणतात लग्न म्हणजे दोन घराचं मिलन...एकमेकांची सुख दुःख समजून घेणं... मुलगी आपल्या आईबाबांना सोडून सासरी येते, आणि पटकन नवऱ्याच्या आईबाबांना आपलसं करते... पण जावई..... त्याच काय? तो घेतो अगदी सहजतेने आपल्या सासू-सासऱ्यांची जबाबदारी अगदी सहजतेने (क्वचित)असेलही एखादा... स्त्री-पुरुष समानता हक्क वाढतोय हल्ली....म्हणून हाही बदल अपेक्षितच... या विषयावरचं माझी ही कथा...
आज सायली खूप उदास होती.ऑफिस मधून सुट्टी घेऊन सरळ आईकडे गेली..सकाळपासूनच तिच्या मनात हुरहूर वाटत होती. नक्कीच काहीतरी झालंय असं तीच मन वारंवार म्हणत होत, म्हणून सरळ ती आईला भेटावं म्हणून घरी नवऱ्याला न कळवताच गेली. बघते तर काय???? आई झोपलीय, या वेळेस तर आई कधीच झोपत नाही, आणि तिचा फोन पण बंद... तिने आईला आवाज दिला, अंग पण खूप गरम लागत होतं तीच..... तिने लागलीच कॅप बुक केली आणि आईला दवाखान्यात नेलं, डॉक्टर ने काही टेस्ट केल्या....डॉक्टरांची शंका खरी निघाली...तिला नुमोनिया झाला होता. खूप अशक्तपणा आला होता. आईला औषध देऊन ती घरी आली....घरात पाय ठेवताच... संजय तिचा नवरा जोराने ओरडला ,"सायली कुठे होतीस, तुझा फोन पण बंद दाखवतोय... तिच्या लक्षात आलं ,आपला मोबाइल discharge झालाय ते...
सायली----अरे, ते...मी न.. संजय---तुला माहिती आहे ना,आई-बाबा घरी एकटे असतात ते...बाबांना सर्व वेळेवर हवं असत,, आईच्याने पण आता जमत नाही.... कितीदा सांगितलं तुला, जमत नसेल तर सांग...आईबाबांचे हाल झालेले मला बिलकुल खपणार नाही... सायली--अरे, ऐकून तर घे माझं म्हणणं.... पण संजय ऐकण्याच्या मनःस्थितीत होताच कुठे.... पुरुषार्थातला इगो आलाच शेवटी आड... आता सध्या तरी याच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही, वादातून वाद वाढतात म्हणून नेहमीच तीच नमतं घायची. म्हणून ती पटकन फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागली. पण मन मात्र आईकडे लागलेलं होत तीच.... सायली आणि तिची आई एवढंच काय ते तीच कुटुंब. तिचे बाबा ती लहान असतांनाच अल्पशा आजाराचं निमित्त्य होऊन वारले. तेव्हापासून तिचा सांभाळ, शिक्षण, नोकरी लागेपर्यंत केलं. संजय च्या घरचं स्थळ आलं आणि लगेच लग्न पण जुळलं...तिने तेव्हाच संजय ला आईबद्दल सांगितलं होतं... मला आईची खूप काळजी वाटते रे....तू देशील ना साथ... त्यावेळेस मात्र संजय हो म्हणाला... पण त्याने आपली जबाबदारी स्वीकारली नाही....पण सायली मात्र दोन्ही घर सांभाळायची.
संजयच्या आईबाबांचं तर तिच्याशिवाय पानसुद्धा हलत नसे.ती पण त्याचं सर्व सख्ख्या आई वडीलांप्रमाणे करायची. पण आताशा मात्र आपल्याआईच्या काळजीने ती कासावीस व्हायची....तिच्या तब्येतीच्या कुरकुरी हल्ली वाढत चाललेल्या... तिला बरेचदा वाटायचं आपण संजयच्या आईवडिलांना किती लवकर आपलंसं केलंय... पण संजय मात्र त्याची जबाबदारी पार पाडत नाहीये.... घरी गेल्यावर संजयशी या विषयावर बोलावं म्हणून ती मनाची तयारी करूनच आली होती.....पण???? पुढील भागात वाचा सायलीच्या मताशी संजय सहमत होईल का???? स्वीकारेल तो तिच्या आईची जबाबदारी???