आधारवड
आधारवड


केतकीच्या नजरेत तिच्या बाबांबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता. तिचा बाबा तिच्यासाठी हिरो होता. मुलगी झाली म्हणून तिचे जन्मदाते वडील अचानक मायलेकीला सोडून परागंदा झाले होतेे. आईने तिच्या आणि स्वतःच्या चरितार्थ आणि आधारासाठी दुसरे लग्न केले. सावत्र पित्यानेही तिला मायेचा लळा लावला. सावत्रपणा कुठेही जाणवू दिला नाही.
त्याने न्यायालयात कायदेशीररित्या तिच्या पालकत्वाच्या अधिकारासाठी अर्ज केला. न्यायालयानेही गेल्या काही वर्षापासून पत्नीसह तिच्या मुलीचा सांभाळ करणार्या त्याला कायदेशीर पालकत्व मंजूर केले आणि बाप-लेकीच्या नात्याची पकड आणखी घट्ट झाली होती. त्याला भीती होती तिचा खरा बाप येऊन तिच्यावर अधिकार सांगून तिला त्याच्यापासून तोडणार तर नाही ना?
त्याने आधारवड बनून एका मायलेकीचं जीवन समृद्ध केलं होतं.