Jyoti gosavi

Tragedy

5.0  

Jyoti gosavi

Tragedy

आधारवाटा

आधारवाटा

2 mins
608


त्या अंधारपोकळीत तिचं प्राणपाखरू घुटमळतंय, पाकोळीप्रमाणे इकडून तिकडे गिरक्या घेतंय, भिंतीला धडका मारतंय, बाहेर पडण्यासाठी तिचा जीव घुसमटतोय त्या नराधमांनी तोंड दाबून धरल्याने धड श्वासही घेता येत नाही. तडफड, तडफड होते जिवाची. अरे हो !आता तर ती मुक्त आत्मा होती. खरंतर या वेदना तिला होण्याचं काहीच कारण नव्हतं, पण जे तिने सहन केलं ना ते तिचा आत्मा पण विसरला नव्हता. हिंदी सिनेमात  डायलॉग मारतात ना, मै तुम्हे इतना तडपा तडपा के मारुंगा की तेरी रूह भी काँप जायेगी. अजून तिचा आत्मा त्या  दहशती तून बाहेर पडला नव्हता काय चुकलं होतं तिचं... ती एक स्त्री झाली एवढंच? लहानपणापासून आई-बापांनी तळहाताच्या फोडा प्रमाणे जपली होती तिला. खेळताना कधी पडली आणि थोडंसं जरी लागलं तरी तिच्या आधी आईचा जीव कासावीस व्हायचा, ती म्हणेल त्या गोष्टी पुरवणारे, मागेल ती वस्तू आणून देणारे तिचे लाडके पप्पा त्याप्रसंगी जवळ नव्हते ना ते पंधरा ते वीस मैल लांब होते.


तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. कधी त्यांनी तिला पाच बोटंदेखील लावली नव्हती, कधी शब्दाने ओरडले नव्हते .कारण ती होती पण तशी शहाणी आणि गुणी दरवेळी अभ्यासात प्रगती करत डॉक्टर बनली. आईबापाचा ऊर मोठा आनंदाने भरून आला. आता तिच्या लग्नाचा विचार करत होते तिलाही एक जण आवडला होता आपलं ते गुपित ती उद्या घरी सांगणारच होती आणि आजच तिच्यावरती हा जीवघेणा आणि लाजिरवाणा प्रसंग उद्भवला ज्या शरीराला कोणाचा चुकून धक्का घरी लागला तरी प्रचंड राग यायचा त्या शरीरावर चे कपडे त्यांनी टराटरा पाडले फाडले पार चिंध्या चिंध्या केल्या आणि तिच्या नग्न शरीरावर एखाद्या  लांडग्याप्रमाणे ते तुटून पडले जे आजपर्यंत जपलं होतं ते एका क्षणात त्यांनी नष्ट केलं .आई ग !वेदना वेदना होतात शरीरभर, रडता येत नाही, ओरडताही पण येत नाही. तिने तिच्या परीने खूप प्रतिकार केला. पण त्या सुकुमार हरणीचं चार लांडग्यांपुढे काही चाललं नाही आणि नाक तोंड दाबल्याने जीव घुसमटून तिचं प्राणपाखरू शरीरातून केव्हाच बाहेर पडलं. तरी ते नराधम तिच्या मृतदेहावर बलात्कार करीतच राहिले आणि तिच्या जीवाचं पाखरू अंधार वाटा शोधत चरफडत, तडफडत धडका देत होतं अनंताच्या पोकळीला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy