शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

आधार

आधार

5 mins
213


     वसुधा आणि मिलिंद दोघेही दांम्पत्यपुण्यात राहायचे. दोघेही रिटायर्ड होते. पेन्शनमिळत होती. दोघांनी खुप कष्ट करून सुखानेसंसार केला होता. पुण्यात त्यांनी फ्लॅट घेतला.तिथे दोघेही राहत होते. सगळ्या सोईसुविधाहोत्या. त्यांच छान जीवन चालू होत. दोघांनाकुणाला मदत करण्याची आणि समाजसेवेचीफार आवड होती. दोघेही या वयात देखीलकाही ना काही काम करतच असत. ते जेव्हापुण्यात आले तेव्हा वसुधाला एक छान कामकरणारी मिळाली. तीच नाव मधू. पुण्यातबाहेरच्या राज्यातुन नवर्‍यासह आलेली.ती वसुधाकडे सगळ घरच काम करायची.मधु स्वभावाने छान होती. वसुधाला मावशीम्हणायची आणि मिलिंदला काका म्हणायची.सगळ काम एकदा दाखवल तशी व्यवस्थितकरायची. वसुधाला कसलीही तक्रार नव्हती.थोड्याच दिवसांत वसुधा आणि कामवालीमधु यांच्यात चांगली मैत्री झाली. मधु शक्यतोकधीही सुट्टी घेत नव्हती. तिला वसुधा मावशीचीतब्येतीविषयी माहीती होत. त्या दोघांचही वयझालेल होत. त्यांच इथे जवळपास थोडेच नातेवाईक होते. मधु त्यांच सगळ अगदीघरच्यासारख काम करत होती. ती वयानेलहान होती. शिक्षण झालेल होत थोडफार पण वसुधा मावशी तिला पुस्तक वगैरेवाचायल्या द्यायच्या. एवढ्या दिवस कधीचतिने पुस्तक हातात धरल नव्हत. पण वसुधामुळे ती वाचन करायला लागली. तेवढचतिला मनाला बर वाटायच. वाचनाने विचारप्रगल्भ होतात. अस सगळ रोजच छान दिवस जात होते. मधुला हे सगळ काहीसणावाराला तिला भेट द्यायचे, आपल्या मुलीसारख मानायचे. कधी काही अडचणअसेल तर पैशांचीही मदत करायचे. मधुहीसुट्टी न घेता प्रामाणिक पणे आपल कामकरत होती. ती तीन वर्षांपासुन काम करतहोती.      


अचानक कोरोना आला. त्यावेळी लाॅकडाउन जाहीर झाला आणि त्याचदिवशीमधुच्या गाववाले सगळे निघून गेले. तिने जाताना वसुधा मावशीला सगळ सांगुनगेली. आम्ही गावाला जातोय, परत येऊम्हणून ती निघून गेली. काकांनी तिला" मधु तु जाऊ शकतेस, तुमच्या गाववालेसगळे चाललेत तु इथे एकटी कशी राहशील."" काकुनेही तिला सांभाळून जा काळजी घेम्हणुन तिला निरोप दिला "वसुधा आणी मधु दोघींच्याही डोळ्यांत अश्रुहोते. मधु निघून गेल्यानंतर लाॅकडाऊन होता.आता काय करायच ? वसुधाला तर जास्तकाम करण हातामुळे झेपत नव्हत. म्हणूनत्या आजूबाजुच्यांना विचारत होत्या."की कामवाली बाई मीळेल का म्हणून " पण बहुतेकांचे हेच हाल झाले होते. हे कामगारसगळे पुण्याबाहरचे कींवा दुसर्‍या जिल्ह्यातीलअसल्यामुळे ते आपापल्या गावी निघून गेले.कोरोनामुळे बर्‍याच जणांचे काम गेल मगते शहरात थांबुण काय करतील ? त्यांचकस भागेल. त्यात काम नाही म्हटल्यावर दोन वेळैच्या जेवणाची भ्रांत त्यामुळे अनेकलौकांनी आपल गाव बर म्हणून निघून गेले.     


मिलिंद वसुधाला समजावत होते." तु टेन्शन घेऊ नकोस वसुधा, मी ही तुलामदत करेन, आपण दोघे मिळून करूया.... "वसुधाला मिलींदचे हे शब्द ऐकताच तिलाबर वाटल. वसुधाला माहीती होत की मिलिंदचत्यांच्यावर खुप प्रेम होत. त्यांना खुप काळजीवाटत होती. कोरोनामुळे कुणी बाई मिळतनाही म्हणून वसुधा आणि मिलिंद घरातलसगळ काम दोघेही मिळून करत होते. दोन चार दिवस झाले असतील ते ॲडजेस्टकरत होते. ते दोघे खाली त्यांच्या कँम्पसमध्ये बसले होते. तर एक बाई कामाचविचारत होती. पण सर्वांकडे काम करणारेहोते. तर वसुधाने ऐकल नि त्या बाईलाबोलवल. तेव्हा त्या बाईने तिला कामाचीखुप गरज असल्याचे सांगितील. तर वसुधाकाकुने तिला नाव वगैरे सगळ विचारल.तिने इथेच राहते सांगीतल. करोनामुळेतिच्या नवर्‍याच काम बंद झाल होत.तिच नाव अंजना, तिला दोन मुले शाळेतशिकत होती. ऑनलाईन अभ्यास चालू होता.तर तिला कामाची खुपच गरज असल्याची दोघांच्याही लक्ष्यात आले. तिला दुसर्‍या दीवशीपासुन यायला लावल कामावर,तिचा पगार तिला विचारला तस " एवढ्याकामाचे तुम्हांला जेवढे पैसे योग्य वाटततेवढ तुम्ही द्या. " मी काम करायला तयारआहे. तेव्हा मिलिंदने मधुला जो पगार तेदेत होते तिला तेवढा देऊ सांगितल आणि" उद्यायासून वेळवर येशील कामाला "तिनेही काकांना हो येईल म्हणून सांगितल.    


दुसर्‍या दिवशी पासुन अंजना कामावर यायला लागली. तिला अनूभव असल्यानेआणि बर्‍याच ठिकाणी तिने काम केललअसल्यामुळे ती कामे पटापट करायची. वसुधाकाकु अंजनावर खूश होत्या. दोन दिवसांनीत्या थोड्या आजारी पडल्या. तेव्हा अंजनानेत्यांना आधार दिला. त्यांची काळजी घेतली.काकांनाही तिने तुम्ही टेन्शन घेऊ नकासांगितल. तिचे ते प्रेमाचे दोन शब्द त्यांनादिलासादायक वाटायचे. अंजना कामालायेताना खुप काळजी घ्यायची. वसुधा काकुनेबर झाल्यावरु तिचे आभार मानले. काकांनाहीतिने धीर देऊन त्यांच सगळ व्यवस्थीत केल." तु आमच्या वेळेला देवासारखी धावूनआलीस बघ, नाहीतर कोण कामवालीनसती भेटली या कोरोनाच्या काळात "अंजना त्यांना म्हणाली काकु खर तर मीतुम्हांला देवासारखे आहात म्हणेल , खरचतुम्ही माझी गरज ओळखून मला कामदिलित आणि मि मागितला असता त्याच्यापेक्षा जास्तच पगार देत आहात. तुमच्यासारखेखुप कमी लोक असतात हो.... "" अग अंजना तुझ्यासारखेही खुप कमीअसतात ग, घरासारखे काम करणारे "दोघींनाही एकमेकींची खुप गरज होती देवानेती पूर्ण केली.   अंजना सगळ काम व्यवस्थित करायची.एक दिवस कामावर आल्यावर वसुधालाअंजना खुप टेन्शनमध्ये असल्यासारखी दिसलीते त्यांनी पाहील नी विचारल... " काय झाल ग अंजना, घरी सगळ ठीक आहे ना, काही प्रोब्लेम आहे का तुला ? "काकुने अस विचारल्यावर ती सांगु की नकोमाझी अवस्था यांना हा विचार करतु होती.काकु पुन्हा विचारतात तेव्हा तीच लक्ष जात.


ती भानावर येते आणि बोलू लागते..." काकु माझी दोन्ही मुल शाळेत आहेत,त्यांच सद्या ऑनलाईन क्लासच चालू आहे.तर मिस्टरही खुप आजारी आहेत. त्यांचामोबाईल पडलाय बंद, तर तोच विचार करतहोते. मैत्रिण म्हटली की जुना एखाद्या भेटलातर विचार दुकानात. तर काकु आत जातात.ति तीच काम करत असते. तिला कामालायेऊन बरेच महीने झालेले असतात. तिचीपरिस्थिती खुप गरिबीची होती. नवरा आजारीअसल्यामुळे तो कामाला जातु नव्हता.ती सासु सासर्‍यांनाही सांभाळत आधार देत होती. वसुधा काकुंनी तिला त्यांच्याकडेअसलेला टॅब दिला आणी काही पैसे असलेलपाकीट तिच्या हातात दिल. अंजना नको म्हणत होती. " आधीच काकु तुम्ही मलाखुप मदत केली, तुमचे उपकार नाही विसरूशकत, तुम्ही जेव्हा कुठेही काम मिळतनव्हत. तेव्हा मला हे काम देऊन खुपमोठी गोष्ट केली. त्यामुळे तर ठीक चाललेलनाहीतर उपासमारीची वेळ आली असतीमाझ्यावर, तुम्ही मला आधार आधार दिलात. "काकु तिला म्हणाल्या... " हे घे पैसे असुदे, मुलांना हा टॅब देउन टाक, त्यांचा अभ्यासथांबला नाही पाहीजे आणि हो तुझ्यामिस्टरांना हाॅस्पिटलमध्ये दाखव... "


" काकु पण हे पैसे खरच नका हो " अंजननेअस म्हणताच, त्या तु मला काकु म्हणतेस नि मग तुझ्या मुलांसाठी या परिस्थितीतमी एवढही नाही करू शकत का ? "अग पैसे आहैत आमच्याकडे पण ते असेतुझ्या गरजेच्या वेळेला उपयोगी येतीलम्हणून दिलेत असु दे... तिने त्यांचे आभार मानले. तेव्हा वसुधा तिला म्हणाली..." आमच्या गरजेच्या वेळेला, आम्हांला खरच तुझी खुप मदत झाली. आमच्या वेळेलातु आलीस... तुझ्यामुळे आम्हांला आधार मिळाला. तु आमच सगळ व्यवस्थीत करते.हि परिस्थितिच तशी आहे आपण माणसांनीएकमेकांना नाही समजुन घ्यायच तर कोणघेणार. " खर आहे काकु तुमच "मिलिंद काका येतात. ते अंजनाच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची एक वर्षांची जबाबदारी घेतात. दोघीही एकमेकींना नेहमीच समजुन घेतात. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy