अ. ल. भयकथा : १. प्रतिबिंब
अ. ल. भयकथा : १. प्रतिबिंब
आरश्यात स्वतःचं रूप निरखून बघणाऱ्या सीमाला अचानक तिचं प्रतिबिंब हलतांना दिसू लागलं. रडता रडता हुंदके देत ते म्हणालं,
"अजून किती दिवस 'सीमा' म्हणून बाहेर जगात वावरशील ?! एक दिवस कुणाला न कुणाला तरी तुझं सत्य समजेलच.. सोड मला.. बाहेर काढ इथून !!..", सीमा मात्र आरशात बघून खुदकन हसली अन् तिचे लालजर्द डोळे क्षणभर चमकून उठले..
***
समाप्त

