STORYMIRROR

Sandip Dorlikar

Romance

3  

Sandip Dorlikar

Romance

विस्मरण

विस्मरण

1 min
28

ग्रीष्मात तु विरलीस 

प्रदूषणाला तु हरलीस 

सृष्टी संध्याकाळच्या दिपाला का बरं विसरलीस?...

वने पानझडीत सौंदर्य हरवली जरी 

पळस लाल फुलांनी सजली तरी

सृष्टी तु आंबाच्या मोहरांनी बहरून आलीस .....

तुझे रौद्र रूप दिसते आहे 

होळीच्या उत्सवात हसते आहे 

सृष्टी तुझे स्वरूप माझ्या ह्रदयात ठसते आहे.....

तुझी काळजी मी करीत असतो 

तुझ्या आठवणींनी जीवन जगीत असतो 

सृष्टी मी तुझ्या प्रेमात दिव्याची ज्योत होऊन विझून जातो......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sandip Dorlikar

Similar marathi poem from Romance