STORYMIRROR

Sanjay Ronghe

Inspirational

3  

Sanjay Ronghe

Inspirational

वीरांची गाथा

वीरांची गाथा

1 min
744

आठवा जरा त्या वीरांची गाथा

दिले स्वातंत्र्य उंचावला माथा ।


 शूर वीर ते चढलेत फासावर 

राष्ट्रभक्तीचे गीत गाता गाता ।


धन्य धन्य ते वीर स्वातंत्र्याचे

धन्य त्यांचे माता आणि पिता ।


घरदार सोडून झाले ते वीर

माँ भारतीची बघून व्यथा ।


नाव किती मी घेऊ वीरांचे

आठवा जरा हो त्यांना आता ।


वचन मागती आज ते सारेच

नका विसरू बलिदानाची कथा ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational