वेध गुलाबी थंडीचे
वेध गुलाबी थंडीचे
तुज पाहता क्षणी गं
वेड लागले प्रेमाचे
भेटण्यास तुज राणी
वेध गुलाबी थंडीचे
तुझ्या कुशीत घे मज
नाही आंधळा विश्वास
ऊब प्रेमाची दे सदा
तुझ्यातचं माझा श्वास
नको काही बहाणे गं
तुझ्यासाठी मी जगतो
तुला रोज बघून मी
तुझ्यावर मी मरतो
मिलनास आसुसले
माझे प्रेम वेडे मन
प्रेम पिसारा फुलण्या
वाट पाहे धुंदी क्षण
मनो मनी मानले मी
तूज जीवन संगिनी
अश्या गुलाबी थंडीत
नाद तुझाचं ये कानी

