तुझा हात असाचं हाती असावा
तुझा हात असाचं हाती असावा
तुझा हात असाचं हाती असावा
तुझा स्पर्श गंध मनी फुलावा ll ध्रु ll
सख्या तुज भेटीस मन आतुरले
मिलनासाठी हे क्षण रे आसुसले
तुझ्या न माझ्यात काही भेद नसावा
तुझा हात असाचं हाती असावा ll 1 ll
तुझी ओढ लागता ज्या क्षणी
प्रीतीचा फुलोरा फुलतो मनी
स्वप्नात नव्हे तू साक्षात मिळावा
तुझा हात असाचं हाती असावा ll 2 ll
नको तो अबोला नको तो दुरावा
कश्यास हवा तुज आता पुरावा
क्षणो क्षणी तूचं मनी वसावा
तुझा हात असाचं हाती असावा ll 3 ll