STORYMIRROR

Ashvini Atkare

Romance

3  

Ashvini Atkare

Romance

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे

1 min
370

गुंतता हृदय हे प्रिया

मी न माझे राहिले

मज हृदय अंतरी

रूप तुझेचं पाहिले


गुंतता हृदय हे सख्या

नको तो आता दुरावा  

जवळी घे ना जरासा

काय तुज देऊ पूरावा


गुंतता हृदय हे राजा

मिलनास हे आतुर क्षण

दे मनी मज गारवा रे

आसुसले वेडे हे मन


गुंतता हृदय हे प्राणा

असू दे तुझा हात हाती

जीवनाच्या वाटेवर सदा

सख्या तूचं माझा सोबती


गुंतता हृदय हे राया 

लागी जीवा तुझीचं ओढ

दोघेही चल बनवू दुनिया

नांदू सुखाने, राहूया गोड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance