वेड
वेड
मला वेड आहे
पण तुझ्या सौंदर्याचं नाही
तुझ्या प्रेमात वेडा आहे मी
पण ते वेड इतकेही नाही
माझी ओळख मी विसरून बसावे
माझी तुझी स्वप्ने वेगळी आहेत
तुझं माझ्यापेक्षा वेगळं असणंच
मला तुझ्या प्रेमात पाडतं
प्रत्येक वेळी नव्याने
स्वप्नातही वाटलं नव्हतं
मी तुझ्या प्रेमात पडेन
पण नियतीने मला
ओढून नेलं तुझ्याकडे
का ? ते माहीत नाही
पण मला आतून
जाणवत...काहीतरी
अकल्पित आणि
अनाकलनीय
आहे माझ्या
वेडात...

