वाट पाहू पावसाची
वाट पाहू पावसाची
सरली रात्र आणि
झाली कशी पहाट।
आज सूर्याचा दिसतो
काही वेगळाच थाट।
सकाळपासूनचा क्रोध
उष्ण करून गेला वारे।
झाली धरती तांबडी
अंग निघते भाजून सारे।
गारवा सारून गेला
थेंब पाण्याचा सुकून गेला।
निरभ्र झाले आकाश
ढगही दूर उडून गेला।
वाट पाहू पावसाची
क्रोध सूर्याचा जाता।
फुलेल हिरवळ सारी
ढग आकाशी येता।