उभे वारे
उभे वारे
दुःख माझ्या नशीबी
देवा सतत का रे सारे।
जेव्हा जेव्हा भिडलो संघर्षाशी
आयुष्यात सुटले उभे वारे॥
का रे असे जीवन
जगतो मी कशावाचून।
मनी उदासी असते सदा
चेहरा उदासलेला तेजावाचून॥
दुःख माझ्या नशीबी
देवा सतत का रे सारे।
अालटून पालटून येती
पुन्हा पुन्हा त्याचे फेरे॥
