STORYMIRROR

Suresh Tayade

Romance

3  

Suresh Tayade

Romance

तू

तू

1 min
241

लगावली:- लगागागा लगागागा लगागागा लगागागा

   

भले मी बोललो नाही,तरी समजून घे ना तू

कधी विसरून दुनियेला,सखे स्वप्नात ये ना तू


किती करशील सजने गं,बहाणे रोजच्याला तू

तुझ्या नजरेतली जादू ,मला जगण्यास दे ना तू


तुझ्या वेणीतले मोठे, सुगंधी फूल व्हावे मी

भिनावा श्वास इतका की ,नसावा मी नसे ना तू


दिला हृदयास छळणारा, अबोला सोनचाफ्याने

उतारे मी किती केले ,तरी खुलता खुले ना तू


म्हणे आहे कफल्लक तू,भुकेल्या झोपडीमधला

हिरे शब्दातले माझ्या,सखे शोधून घे ना तू


Rate this content
Log in

More marathi poem from Suresh Tayade

Similar marathi poem from Romance