STORYMIRROR

Suresh Tayade

Others

3  

Suresh Tayade

Others

नवे रंग भरू

नवे रंग भरू

1 min
227

रंग टाकू नको

साडी रंगेल रे

मी जपले किती

मन भंगेल रे

नको लाडीगोडी

नको लावू रंग

ओले अजूनही

हळदीचे अंग

बघ आली होळी

नटून थटून

उधळीत रंग

पळसा आडून

धरा न्हाली खरी

प्रीतीच्या रंगात

इंद्रधनू नाचे

होळीच्या ढंगात

चला होळीमध्ये

जातीभेद जाळू

रंग एकतेचा

संयमाने पाळू

वाचेल निसर्ग

अशी होळी करू

बेरंगी जीवनी

नवे रंग भरू


Rate this content
Log in

More marathi poem from Suresh Tayade