तू खूप गोड दिसतेस
तू खूप गोड दिसतेस
खूप गोड दिसतेस...
हातावरील मेहंदीचा गहिरा रंग,
मोरपंखी शालूचा मंद सुगंध,
गालावरची बट हळूच सावरशील,
अन अलगद येऊन,कानात माझ्या सांगशील....
खूप गोड दिसतेस
आता साडीला येणारा दुधाचा सुवास,
हळूहळू वाढणारा शरीराचा व्यास,
आपल्या पिल्लूला तुझ्या कुशीत घेशील,
अन अलगद येऊन कानात माझ्या सांगशील....
खूप गोड दिसतेस
आता मी संसाराच्या आली मध्यावर,
छटा उमटे चेहरा अन केसावर,
हातातील डबा घेताना हळूच हात धरशील,
अन अलगद येऊन कानात माझ्या सांगशील...
खूप गोड दिसतेस
आता वय वर्ष झाले साठ,
सतत दुखते कंबर अन पाठ,
तरीही अलगद उठताना आधार तू देशील,
अन अलगद येऊन कानात माझ्या सांगशील...
तू खूप गोड दिसतेस
आयुष्याच्या शेवटच्या तिरावरती,
फक्त आपण एकमेकांसाठी,
तुझ्या थरथरत्या हाताने हात माझा धरशील,
अन अलगद येऊन कानात माझ्या सांगशील....
तू खूप गोड दिसतेस

