Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nilesh Bamne

Romance

3  

Nilesh Bamne

Romance

तू आणि मी

तू आणि मी

1 min
124


तू आणि मी

त्या दोन ध्रुवासारखे

जे कधीच एकत्र येत नाहीत...

ते दोघेही सारखेच आपल्यासारखे

स्वतःभोवतीच फिरणारे...

तू माणसाळलेली आणि

मी माणुसघाण्या...

तुला जे जे आवडत

ते मला आवडत नाही

मी माझ्या विचारांवर ठाम

तुला विचारच नाही

मी प्रवाहाच्या विरोधात

तू प्रवाहात वाहतेस

तू चुकीची नाहीस

पण मी वेगळा आहे

जगापेक्षा...

तरीही मी तुझ्या प्रेमात...

कारण काही रेषांनी

जोडले आहे आपल्याला

त्यामुळेच एकत्र फिरावं लागतंय नाईलाजाने...

तू मला सोडत नाही

मी ही तुला सोडू शकत नाही

किती विचित्र प्रारब्ध आहे आपलं

प्रेम तर करायचं

पण व्यक्तच व्हायचं नाही

जगासाठी आपण दोन ध्रुव

कालही होतो आजही आहोत

म्हणूनच जगाला फक्त

आपलं सारखेपण दिसतं

पण प्रेम दिसत नाही...

आपण भेटायचं म्हटलं

तरी ते अशक्य

कारण आपण आपल्या

भूमिका बदलू शकत नाही...

तू मला आणि मी तुला

भेटायलाही येऊ शकत नाही...

आता नको वाटतं

हे तुझ्या प्रेमात पडणं

तुलाही तसच वाटत असेल

पण कोणीतरी आपल्या

प्रेमात पडलेलं आहे

हे आपल्या असण्याला

असणं देऊन जाते

म्हणूनच की काय ?

तुझ्या प्रेमातून

बाहेरच पडता येत नाही

कधीच...

मी म्हणतो तू तरी

प्रेमात पड कोणाच्यातरी

तू म्हणतेस तू पड...

कसं पडू ...?

आपलं सारखेपण

कसं विसरू....

रोज नव्याने

एकमेकांच्या

प्रेमात पडणारं ?

आता दुरूनच पाहत

एकमेकांना पाहत

राहायचं प्रेमाने

जगाचं प्रेम पहात

प्रेमाने...


Rate this content
Log in