STORYMIRROR

शब्द सिद्धांत

Romance Classics Others

4.5  

शब्द सिद्धांत

Romance Classics Others

तुला नाही कळणार...

तुला नाही कळणार...

1 min
8

ती भेट , तो संवाद ते क्षण

पुन्हा नाही मिळणार 

तुझ्या घराच्या वाटेकडे पाऊले 

पुन्हा नाही वळणार 

माझ्या शब्दांच्या भावना गुदमरत आहेत

सोड जाऊदे.... तुला नाही कळणार !


स्मृतींच्या झोपाळ्यावर 

झोका घेत जगणे

कोमेजलेल्या गुलाबाकडे

तासं-तास बघणे

पहिल्या भेटीचा तो आनंद पुन्हा नाही मिळणार

सोड जाऊदे.... तुला नाही कळणार !


संवाद संपत चाललाय

बोलण आता होत नाही

सांगायाला खूप आहे पण

भावनेची किंमत नाही

वेळ सोडून कारणे देशील अस कस चालणार

सोड जाऊदे.... तुला नाही कळणार !


पुन्हा एकदा विचार कर

दुःख , हताशा लपवता येईल का ?

माझा हा चेहरा तुला

विसरता येईल का ?

दोघांचे मार्ग बदलतील पण आठवणी मात्र छळणार

सोड जाऊदे.... तुला नाही कळणार !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from शब्द सिद्धांत

Similar marathi poem from Romance