STORYMIRROR

Sonali Shinde

Romance

3  

Sonali Shinde

Romance

तुझ्यातली तू

तुझ्यातली तू

1 min
188

दुःखाच्या छटा काजळाच्या कडांनी भरुन काढ प्रिये 

ओसरू देऊ नको ओठांचे रंगबेरंगी धबधबे

कंठाला करून टाक सतत मोकळं स्वरांतून

वक्षस्थळावर नको घालू पडदा नजरेचा

आणि कंबरेवर नाचू दे मनसोक्त मोरपिसारा

कुणाच्या ही हातुन

प्रिये यौनीच्या प्रवासाला कधी निघते तू 

का तिथे ही आहे अजुन पडद्याच्या रांगा

प्रिये सुंदर आहे शरीर तुझं आणि मनाला किती हे पापुद्रे दुःखाचे 

एकांत शोध आता मोडकळीस आलेला

क्षणभर थांब तिथे विसाव्याला प्रिये शांत कर मनाला 

न्याहाळत राहा सुंदर कुरूप देहाला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance