STORYMIRROR

Rupesh Bhisaji Parab

Romance

3  

Rupesh Bhisaji Parab

Romance

तुझ्या सोबत

तुझ्या सोबत

1 min
817

जगण्याला आज माझ्या कारण भेटलंय,

थोडं जगायचं म्हणतोय....

तू सोबत आहेस तर,

थोडं हसायचं म्हणतोय....


चाललोय खूप एकटा आता तुझ्यासोबत,

चालायचं म्हणतोय....

देशील ना साथ मला,

आता नव्या वाटा शोधायचं म्हणतोय....


प्रेमळ तुझा सोबतीने नव्या वाटेवर चालताना,

थोडंसं धडपडावं म्हणतोय....

आपल्या दोघांसाठी नव क्षितिज शोधावं म्हणतोय....


माझ मन तर केव्हाच दिलंय तुला,

ओंजळ तुझी प्रेमानं भरावी म्हणतोय....

डोळ्यांत साठवून तुला,

भरभरून पाहावं म्हणतोय....


प्रेमात तुझ्या अखंड बुडुन,

सुख-दु:ख सोबत वाटावी म्हणतोय....

माझ्या जीवनात तुझ्या स्वप्नांची,

पहाट उजाडावी म्हणतोय....


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

More marathi poem from Rupesh Bhisaji Parab

Similar marathi poem from Romance