STORYMIRROR

Rupesh Bhisaji Parab

Others

3  

Rupesh Bhisaji Parab

Others

बदललेल गाव

बदललेल गाव

1 min
252

दर चार पाच महिन्याने मी येतो गावी

गाव दिसत बदललेल दरवेळी

हेच का ते आपलं गाव विचार मनात येतो वेळोवेळी

कुठेच मातीची घर दिसत नाहित आणि मातीतील माणसही नजरेस येत नाहित

सिमेंटची झालीत सगळी घर आणि सिमेंटचीच माणसं

सारी मातीतील माणसांना ओढ होती

मनात ओलावा होता पटकन यायचीत धाऊन

सिमेंटच्या जंगलात हरवलाय ओलावा

धरून बसतात आपल्याच घरच्या भिंती

एकच असायची टिव्ही वाडीत

जमायची माणस बघायला मॅच कुठे सिनेमा

आता प्रत्येकाच्या घरात डीश टिव्ही बघतात हवा येऊ द्या

आणि एकट्याच हसतात पारावर जमायची जुनी जाणती

व्हायची चर्चा शेता भाताची

आताही जमतात सगळीच करतात चर्चा

मोदिने काय करायच याची

मिरग जवळ येतोय तशी लगबग वाढायची

आंबोळी, घावने, उसळ ह्याचाच पावनेर

आता दिसत नाहित गुर आणि ढोर मांगर,

वाडे रिकामे नांगर खुंटीवर

खरच बदललाय का गाव कि मिच बदललोय

काय समजेना राव तरीहि मी येतोच

चार पाच मिहीन्यात जमेल तेवढ गाव साठवतोय डोळ्यांत


Rate this content
Log in