तुझी आठवण
तुझी आठवण
थोडासा विसावा आठवून तुला
मनामध्ये खोलवर साठवून तुला
अश्रूंसवे गालावर ओघळून आलास
हसली मुद्दाम डोळ्यात परत पाठवून तुला
आठवते तुझे ते स्पर्शाने बोलने
हिणवून मला नजरेने तोलने
गोंजारत तु दिलेल्या जखमांना तरीही
तुला पाकळीगत पापण्यांवर झेलने
तरीही,तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
माझा ही श्वास पुरावा
आठवून तुला रे मिळतो विसावा
तरी मी तुला विसरायचा प्रयत्न करावा
ते क्षण विसाव्याचे पुन्हा ये घेऊन
ओंजळीतले फुले आता सुकले रे
प्रयत्न केला मी तुझ्याशी खूप बोलण्याचा
शब्द माझे ओठांमध्येच मुकले रे

