STORYMIRROR

Nilesh Bhopatrao

Romance

3  

Nilesh Bhopatrao

Romance

ती परी आसमानीची

ती परी आसमानीची

1 min
174

पुन्हा एकदा पाऊस आला…

पुन्हा एकदा तीला भिजवून गेला 

मी पहात होतो त्याला अन् तीला 

ओलती ती सावरत होती 

क्षणोक्षणी आपल्या पदराला … 


चिंब , चिंब भिजलेली …

नखशिखांत ओथंबलेली ..

पहातच होतो मी …तीला

कपाळावरूनी , गालांवरूनी 

डोळ्यांवरूनी अन् …

गुलाबी ओठांवरूनी …


एक एक मोती घरंगळताना 

भासत होती .. ती

परी कुणी आसमानीची..

अवतरलेली धरेवर जणू 

आजच्या पावसातच 

मनसोक्त विहार करण्यासाठी..

पुन्हा एकदा पाऊस आला 

पुन्हा एकदा तीला भिजवून गेला 

ती परी आसमानीची …



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance