STORYMIRROR

Ganesh Patil

Romance

4  

Ganesh Patil

Romance

तिच्या वरच्या कविता

तिच्या वरच्या कविता

1 min
367

|| तिच्या वरच्या कविता ||


         (१)


पाऊस सारखा कोसळत असतो

वाट मिळेल फाटा फुटेल तिकडे


बेवारस पाऊस गुंतत जातो

तुला परीघ करून तुझ्यात


कळत

नकळत...


      (२)


माझ्या अंत्ययात्रेचा प्रवास

तुझ्या वाटेवरून संपल्यावर


प्रेत माझे समशानात

शांत विझल्यावर 


तू

आठवणीने

माझ्या राखेतून 

तुझ्या वरच्या कविता घेऊन जा...



     (३)

तु 

निघुन गेल्यावर 


तसं


फारस 

काही घडलंच नाही...


  

       ( ४)


कित्येकदा 

कविता 

वाहून जातात,

डोळ्यातून

तू आठवल्यावर...


     

        (५)

नकोना

आयुष्यात 

चांदन्यांचा खेळ मांडू

पुढे तुला 

मोकळे आकाश आहे..



      (६)

एक

तुझेच नाव

होते 

ओठांवर 

शेवटी 

गाव 

सोडतांना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance