प्रवास
प्रवास
तोडणाऱ्याने काटे मोजू नये
ओठ चुंबणाऱ्याने किनारे शोधू नये,
लाख सोबतीची करार केले आपण
हात दिल्यावर वायदे तू तोडू नये,
येवढा कसा जीव द्यावा एखाद्या वर
हृदयाचा ठोका सुरू बंद कळु नये,
उगाच आणतो लाखदा मी चेहऱ्यावर हसू
सुखा मागचे माझ्या दुःख तुला कळु नये,
अखेरीस वेगळ्या केल्या आपण वाटा
एक तुला एक मला प्रवास संपू नये...