तिचे जाणे....
तिचे जाणे....
आयुष्यातून त्याच्या ती अगदी सहज निघून गेली
सोबतीने चालू केलेला प्रवास अर्ध्यावर सोडून गेली
त्याच्या मनाची व्यथा तिला जराही नाही कळाली
आयुष्यभरासाठी जोडलेलं नातं क्षणात तोडून गेली
तिच्यासाठी तो साऱ्या जगाशी लढला होता
तिला जिंकण्यासाठी तो मात्र स्वतः हरला होता
एक एक करून जवळची माणसं त्याची दुरावली
तिची साथ मात्र त्याला काही क्षणांसाठीच मिळाली
तिच्याशिवाय आयुष्य त्याचे आता रिते झाले
डोळे मात्र तिच्या आठवणीने भरून आले
का असे झाले हे काही त्याला कळलेच नाही
कदाचित तिचा जीव कधी त्याच्यात गुंतलाच नाही
