STORYMIRROR

Ashvini Kurmawar

Others

3  

Ashvini Kurmawar

Others

अन् तो बरसू लागला...

अन् तो बरसू लागला...

1 min
231

एकदा अशीच होते बसलेले

त्या गच्च भरून आलेल्या ढगांकडे एकटक बघत होते

कुतूहल नजरेने मनात आठवणींशी गाठीभेटी झाल्या होत्या

अन् संवाद सुरू होता मनाचा त्या काळ्याभोर गच्च दाटलेल्या ढगांशी

असं वाटलं त्याच्याकडेही असेल ना भरपूर काही सांगण्यासारखे

मजेशीरत्या मिलो दूर असलेल्या ढगांतल्या काही गोष्टी

दूरवर झालेली ढगांची टक्कर, लखलख चमकलेल्या विजेची अन् गारठलेल्या थंडीची कहाणी,

वाऱ्याचं इकडून तिकडे तिकडून इकडे धावणं, पाण्याच्या थेंबांच जमिनीवर येण्यासाठी धडपडणं असं बरचसं काही.

आणि त्याच्याकडे बघितल्यावर जाणवलं की जणू हे सगळं सांगण्यासाठीच तो आतूर झालाय

त्याचं हृदय जसं भरून आलंय अन् तो आता भेटायला येणार आहे

तेवढ्यात अचानक विजांचा लखलखाट अन् ढगांचा गडगडाट झाला

आणि तो बरसू लागला चोहीकडे गारवा पसरवत,

झाडा-वेलींना चिंबचिंब भिजवत, सूर्याशी लपंडाव खेळत मनसोक्त, धुवाधार

कशाचीही पर्वा न करता 

जणू मनातल्या गोष्टी सांगू लागला

अन् तो बरसू लागला....


Rate this content
Log in