STORYMIRROR

Yogesh Khalkar

Inspirational

3  

Yogesh Khalkar

Inspirational

तेरावा दिवस 06 / 04 / 2020

तेरावा दिवस 06 / 04 / 2020

1 min
315

संपूर्ण विश्व या क्षणी रणांगण झाले

एका कोरोनाने युद्ध हे लादले


तया विरुद्ध आपण सर्व लढू या

सर्व मिळून या विषाणूस मारु या


करा स्नान, पुनःपुन्हा धुवा हातपाय 

राहण्या स्वच्छ निरोगी हाच उपाय 


युक्त आहारविहार घरातची करावा 

घराबाहेर जाण्याचा विचारही न धरावा 


करण्यासारखे घरात खूप काही आहे 

कोपरे घराचे स्वच्छतेची वाट पाहताहे 


करू या संवर्धन आपुल्या छ्न्दाचे  

वाचा, लिहा, करा रसग्रहण पुस्तकांचे 


नका ऐकू जनाचे, नका ऐकू मनाचे

सावधान होऊन संदेश पाळा शासनाचे 


नका उपेक्षू डॉक्टरांचा लहानसा सल्ला

शेजारधर्मही जरा दुरूनच पाळा


येईल यश ठेवा देवावर विश्वास

नष्ट होईल कोरोना असू द्या आत्मविश्वास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational