सय
सय
घुमे वळिवाचा वारा
पडे पावसाची धार,
ओल्या हळव्या मनाला
आज सोनेरी किनार...
पावा घुमतो हरीचा
चिंब भिजल्या रानात,
सय भिजते गं आता
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात...
पाऊस तुफान हा वेडा
उभा दारावर माझ्या,
मी शोधतो वहीत
ओल्या आठवणी तुझ्या...
मन पाण्यात भिजले
उरी आठवांची धाप,
रात जागून काढली
मला विचारांचा शाप...