STORYMIRROR

Eshvari Dhawale

Fantasy

3  

Eshvari Dhawale

Fantasy

स्वप्नांच्या पलीकडे

स्वप्नांच्या पलीकडे

1 min
16

स्वप्नांच्या पलीकडे खरंच काही सापडेल का 

स्वप्नांच्या शोधात मन रात्री तरी झोपेल का 

कायम वाटते या मनाला असेच का आणि तसेच का 

स्वप्नांच्या पलीकडे परी मला दिसेल का 

हास्य मधून मोती पडताना सुंदर परी असेल का 

स्वप्नांच्या पलीकडे खरंच काही दिसेल का 

त्या स्वप्नांची सुंदर गाणी स्वप्नात सुद्धा 

भरता पाणी असेच का तसेच का 

स्वप्न असे पडता का पलीकडे नेऊन सोडता का 

जगण्यावर हिरमुसता का थोडेसे रुसून बसता का 

स्वप्नांच्या पलीकडे खरंच काही सापडेल का 

रोज पडणारे स्वप्न कधीतरी संपेल का 

स्वप्नांच्या पलीकडे खरंच काही सापडेल का 

या प्रश्नाचे उत्तर स्वप्नात परी देईल का 

असेच का तसेच का प्रश्न माझे का 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy