STORYMIRROR

Vihang Mayekar

Abstract

3  

Vihang Mayekar

Abstract

स्मृती

स्मृती

1 min
155

मेघ ओल्या भावनांची, शब्दरूपी आंदणे..

आठवांच्या साठवांची, चंद्रमोळी कोंदणे..

तोडीतो अन् जोडीतो, प्रितीस्मृतीच्या श्रृंखला

गोड-गोडी नागमोडी, शर्वरी आवर्तने..


आर्त भेसूर चातकाचे, रागदारी रूदन

ऐकेल का आतातरी, पाषाणहृदयी वरूण

या इथे अन् त्या तिथे, दाही दिशी गुंजारव

या कुशीहून त्या कुशीला,रात-राती जागणं..


वाहते इंद्रायणी, धमन्यांतूनी ही नीरव

व्याकुळला राधेस का, यमुनातीरी तो माधव

यशोधरेला ना उरे, बुद्धातला करूणाकर

ध्यानस्थ तो मेरूशिरी, पीनाकपाणी शेखर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract