STORYMIRROR

Vihang Mayekar

Romance

3  

Vihang Mayekar

Romance

क्षणांची शिदोरी

क्षणांची शिदोरी

1 min
115

तुझा स्पर्श माझ्या, देही माळताना,

असा रोम रोमात, सामावला..

स्त्रवतो सुगंध, वाऱ्या संगे धुंद,

जसा नागचाफा, वसंतातला....


तुझ्या गोड बोलातली गोड साद 

छेडे तार माझ्या, ही ह्रदयातली..

कुठे मंदिराच्या, घुमे अंतरंगी,

जशी रूद्रविणा, आरोहातली....


तुझ्या बाहुपाशातल्या धुंद राती,

माझ्या आठवांच्या, नभी दाटती..

आणि शरदाच्या, जणू चांदण्याच्या,

अतीव सुखाच्या, सरी वर्षती....


मृदू अधरांच्या, जरा कंपनांना,

गुलाबी क्षणांना, किती आठवू..

आपुल्या प्रितीचे, मुक्या भावनांचे,

असे दीप लाखो, कसे मालवू....


स्मरे श्वासश्वासांतले गुज सारे,

आणि आसवे तृप्त डोळ्यांतली..

पुरे जन्मभरी, क्षणांची शिदोरी,

जपू ठेव ही मर्मबंधातली....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance