STORYMIRROR

Vihang Mayekar

Others

3  

Vihang Mayekar

Others

मायेची स्मरणी

मायेची स्मरणी

1 min
210

शुभ्र फेसाळत्या लाटा, वारा घोंघावत वाहे

दूर क्षितिजा पल्याड, चंद्र पुनवेचा आहे


गर्द निळेशार पाणी, कसे उधाणले आज

माझे मला सावराया, तुझ्या आठवांचा साज


व्यथा मनाची मनात, कोणी कोणास सांगणे

भ्रांत सुखास पडली, कुंद रुपेरी चांदणे


गाज विक्राळ घुमते, भय वाटे क्षणोक्षणी

डोळे मिटून ओढतो, तुझ्या मायेची स्मरणी


माझ्या दुःखाचे सावट, तुझ्या डोळ्यात पाहीन

अर्घ्य ओंजळ भरुन, क्रुद्ध सागरा वाहीन


तारकांच्या पांघरूणा, तुझा उबदार भास

माझ्या उरात भरावा, तुझा अखेरचा श्वास


Rate this content
Log in