STORYMIRROR

Pradip Deshmukh

Romance

3  

Pradip Deshmukh

Romance

सखी

सखी

1 min
13.7K


हा निंब चिंब थरथरे, ऊन गहिवरे, तुला बघताना

श्वासात न्हात, हातात हात, स्पर्शात, धनु फुलताना!

अडखळे गीत ओठात, फूल देठात, बाग झुलताना!

या मंद मंद वार्‍यात, धुंद बाहुत, बंद असताना !

ही आग लागली अशी, खुणावी जशी, तनु जळताना

राधेस लागली ओढ, मिठिची गाढ, श्याम कळताना !

वार्‍यास सांगुनी गूज, जसा अलगूज, अधरी असताना

प्रतिबिंबी खुलावी कळी, शांत या जळी, बिंब बघताना !

सर्वस्व उधळुनी असे, सरावे असे, तुला स्मरताना

हातात हात, श्वासात श्वास,ही एक आस मरताना !!


Rate this content
Log in

More marathi poem from Pradip Deshmukh

Similar marathi poem from Romance