STORYMIRROR

prajwal aiwale

Romance

3  

prajwal aiwale

Romance

सखी माझी

सखी माझी

1 min
478

चाफ्यासारखी धुंद, केवड्याचा गंध

पांढराशिपट तो चांद, सखी माझी


नियमित चालणारं घड्याळ,

लहानग्याहून खट्याळ,

नाजुक मोत्याची माळ,

सखी माझी...


सोन्याहून पिवळी, 

सूर्याने दिलेली थाळी

करवंदाची जाळी, सखी माझी


अभंगासारखी रसाळ, 

मधाहुन मधाळ

पाण्याहुनही नितळ, सखी माझी....


रागावली तर भलतीच तिखट,

हसल्यास ती गुलाबी पहाट,

तुडुंब भरलेल्या नदीचा घाट,

सखी माझी


क्षितिजासारखी दुर, श्वासासारखी जवळ

मनी वसलेलं वादळ, आठवणींचं मृगजळ सखी माझी...!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance