एक भेट अशीही...
एक भेट अशीही...
1 min
466
जावं की न जावं या विचारात
सूर्य मावळतीवर थांबलेला असावा
हिरव्यागार झाडीवर तो आपला
गुलाबी अंगरखा विसरुन जावा,
संध्याकाळही पाहण्यासाठी
एक नदी धावत यावी
नदीकिनारी मी असावा
माझ्याशेजारी तू असावी
सांज आता सरत आली
पाखरांनीही आपल्या घरी जाव
निरोपाची वेळ पाहुन
तूही जरास रुसुन बसाव
पांढरशुभ्र चांदण आता
नदीच्या ओंजळीत तरंगाव
नको नकोसा निरोप घेताना
तू उगाच थोडस हसाव
मिठीततल्या चंद्राला समजावताना
नाकीनऊ याव मला
भेटु ग वेडे उद्या पुन्हा
विलग होताना सांगाव तिला
संथ वाहती नदीसुद्धा
चंद्रसुगंधी रात्रसुद्धा
तिच्याच सोबत निघुन गेली
एकांताच्या असह्य वेदनेत
एक रात्र जळत राहिली
