STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Tragedy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Abstract Tragedy Inspirational

सखा तूच पांडुरंगा

सखा तूच पांडुरंगा

1 min
206

सखा तूच रे आहे माझा

पंढरीच्या माझ्या पांडुरंगा ।

नाही झाले रे दर्शन तुझे

तुझ्यात मन घालते पिंगा ।


शहरात या आहे चालू

कोरोनाचा कसा रे दंगा ।

मिळेल कधी आम्हा शांती

कुणीतरी हो आता सांगा ।


प्राण चाललेत निसटून

मायेची कशी आटली गंगा ।

डोळ्यात आसवांचा पूर

अग्नीही रुसला रे श्रीरंगा ।


तुटता तुटेना साखळी ही

सर्वत्र चालला हा धिंगा

आस तुझीच रे आहे आता

भीक जीवाची दे पांडुरंगा ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract