श्रीमंतीचा माज
श्रीमंतीचा माज
कोण श्रीमंत कोण गरीब सगळी कर्माची फळं आहेत
आज याची वेळ तर उद्या त्याची वेळ आहे....
आज हा कार मध्ये बसला उद्या तो बसणार
चांगली वेळ येईल कारण देव किती वेळ रुसून बसणार...
कोण मोठा कोण छोटा आहे
रिकामे आले रिकामे जाणार आहे.....
लोक म्हणतात वेळ बदलत असते
वेळ बसुन राहत नसते....
आज हा मज्जा करेल तर उद्या तो करेल
एकदा मेल्यानंतर सगळी श्रीमंती पोटात जिरेल......
पैसा कमावला तर लपून ठेवू नका
पुण्य लागत असेल तर दान करून बघा......
