श्रावणधारा
श्रावणधारा
श्रावण आला सुखावणारा,
उन्हात पाऊस रिमझिणारा,
वर्षेसंगे बरसणारा.
रविकिरणांना चमकविणारा
लतावेलीना जोजविणारा,
सरिता दुथडी वाहविणारा,
डोंगरदारीतून घोंगविणारा,
वेगे वायू फोफविणारा
अलगद अवनी फुलाविणारा
इंद्रधनुही अवतरणारा
काय म्हणू या किमयागारा
भूमीवधूला नटविणारा
हिरवा शालू नेसविणारा
दवबिंदूच्या अलंकारा
सुमने अक्षदा उधळणारा
न्हाऊनी जाऊ भक्तीसागरा
प्रतिदिनाच्या महिमा न्यारा
श्रीकृष्ण जन्म गोजिरा
वृषभ, नागाचा सण साजिरा
श्रीफळ अर्पया दर्यासगारा
रक्षिल बंधू बांधून दोरा
असा हा श्रावण रंगविणारा
आबालावृद्ध मोहविणारा
पावन झाली वसुंधरा
श्रावण वसती चराचरा
