STORYMIRROR

Pratibha Patil

Inspirational

3  

Pratibha Patil

Inspirational

शंभू-गाथा

शंभू-गाथा

1 min
276

 सईबाई माता || पिता वीर शिवा

जन्मा आला छावा || पुरंदरी ||१||


माता छत्र जाता || दूध ते धाराऊ ||

वात्सल्य जिजाऊ || बालराजा ||२||


वेदाभ्यास ग्रंथ || पठण लेखन ||

सर्व भाषा ज्ञान || शंभू बाळा ||३||


वाढले स्वराज्य || दुप्पट वेगाने ||

गनिमी काव्याने || कारवाया ॥४॥


पराक्रमी राजा || वाढवी स्वधर्म ||

जगी असे कर्म || किर्तिवंत ॥५॥


शूर मर्द छावा || शौर्याच्या वारूला ||

एकला पाडीला || फितूरांनी ॥६॥


संगमेश्वराला || सोबत पंडित

धरीले कोंडीत || यवनांनी ॥७॥


वीर माझा राजा || संभाजींची गाथा ||

त्यांच्या पायी माथा || मनोभावे ॥८॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational