STORYMIRROR

Pratibha Patil

Others

3  

Pratibha Patil

Others

नववर्ष

नववर्ष

1 min
131

चैत्र प्रतिपदा |ऋतू वसंताचा||

सोहळा सणाचा| नववर्ष||१||


अंगणी रांगोळ्या| तोरण दारास||

उत्साह घरास |पाडव्याचा||२||


पाडव्याचा सण |जुनी असे रूढी||

उभारू ती गुढी |मांगल्याची||३||


सजूनधजून |चंदनाची काठी||

साखरेची गाठी| शोभिवंत||४||


कडूनिंब पाने| वस्त्र भरजरी||

ताम्र लोटा वरी| झेंडू फुले||५||


पानगळातून| जीवन फुलले||

बहरून आले |झाडी वेली||६||


रामराज्य आले| संपे वनवास||

सुखी जीवनास |सुरुवात||७||


गोड कडू सारे| एकत्र करूया||

आनंदे राहूया |सकलिक||८||


संदेश हा असे |खास पाडव्याचा||

नव्या उमेदीचा |सण असे ||९||



Rate this content
Log in