STORYMIRROR

Pratibha Patil

Others

3  

Pratibha Patil

Others

उतराई

उतराई

1 min
427

स्वागताला सजली

अंगणे रांगोळींनी

दिवाळी आली घरी

दार सजे फुलांनी ।।१।।


रंग रोषणाईचे

मंगलमय पर्व

राव रंक सोबत

साजरे करी सर्व ।।२।।


आनंद घेऊ सारे

प्रदूषणाने मुक्त

सण करू साजरा

प्रेमळ भाव युक्त ।।३।।


वाडवडील सांगे

गोधनाचे रक्षण

दिवाळी तेव्हा जेव्हा

मिळे त्या संरक्षण ।।४।।


उतराई होऊन

साजरा करू सण

गाई म्हशीस करू

टिळा भाळी औक्षण ।।५।।


बालकांशी आनंद

दिन दिन दिवाळी

संस्कृती बळीराजा

गाई म्हशी ओवाळी ।।६।।


Rate this content
Log in