STORYMIRROR

Sunil Pawar

Romance

3  

Sunil Pawar

Romance

साथ तुझी

साथ तुझी

1 min
168

साथ तुझी, साथ तुझी,

साथ तुझी असताना,

मला काही नको आता ।।धृ।।

वेडावतो जिव हा माझा,

भेट नाही झाली तर .

डोळ्यात भिडू दे डोळे,

काळजात शिरते नजर.

मनोमनी भरला आहे,

प्रेमाचा तुझ्या रे साठा,

साथ तुझी असताना

मला नको काही आता.।।१।।

माझ्या पहिल्या प्रेमाचा,

तुच आहे रे बाजीगर.

फुलुन जाता मन माझे,.

चढताना ही प्रेम डगर.

सुगंध जणू कस्तुरी चा,

येवो तुझ्या कितीही वाटा.

साथ तुझी असताना,

मला नको काही आता.।।२।।

साथ तुझी ही जन्मभर,

उगवूदे सोन्याची पहाट.

क्षणक्षण जावो आनंदाने,

कुशीत मिळो तुझ्या साथ.

कळी ही उमलती राहो,

तुच असावा प्रेमदाता,

साथ तुझी असताना,

मला नको काही आता.।।३।।


Rate this content
Log in

More marathi poem from Sunil Pawar

Similar marathi poem from Romance