सारे सुखाचे सोबती
सारे सुखाचे सोबती
सारे सुखाचे सोबती । माझं माझं करत येती
संकट समय येता । दिसेनासे सारे होती
रीत आहे जगाची । आनंदात होती गोळा
पळती रे दूर पुन्हा । पाहती दुरुन कळा
प्रकाश वाटे हवासा । जातो सुखावून हृदयास
अंधाराची भिती मात्र । सर्वांच्या मनास
जत्रा भरता येई उधाण । थवे नकली मुखवट्यांचे
पाले उठता राहती ।अवशेष आठवणीचे
मन होई रे उदास । आठवणीच्या हिंदोळ्याने
व्रण तसेच राहती । खोल जखमाने
किलबिल रे पक्ष्यांची । होई फळ झाडावरती
पानगळ वृक्ष मात्र । पाहत राहती
अशी सारी दुनियादारी । तोंडावर तजवीज
पाठ फिरता सुरु होई । फक्त कुजबूज
