साचल्या पाण्यात
साचल्या पाण्यात
रंग भिजले सारे
भिजल्यात दंगले वारे
वाऱ्याच्या झोतासंगे
सळसळती ओली पाने
पानांवरती पाणी
संगे पावसातली गाणी
गवतफुले हिरमुसलेली
चिंब अबोल या रानी
नाचे तनाची पाती
मातीचा ओला गंध
ओल्यात रूतली नाती
सारेच जाहले धुंद
पाऊस पडून गेला
झाले सारे ओले चिंब
साचल्या पाण्यात दिसले
माझे खरेखुरे ते बिंब

