पहिला पाऊस
पहिला पाऊस
दरवर्षी पहिला पाऊस
ओढ लावतो अनामिक
शब्दात व्यक्त होत नाही
मनात ठेवता येत नाही
पाण्याशी असली रोजचीच ओळख तरी
झोंबूस्तोवर करमत नाही
दरवर्षी पहिला पाऊस
दरवर्षी पहिला पाऊस
हुरहुर लावतो क्षणोक्षण
जोवर भेट होत नाही
नभात काहूर दाटत नाही
बरसाती पहिल्या नसल्या तरी
मन काही भरत नाही
पाहूस्तोवर रानातला खोडकर उनाड
दरवर्षी पहिला पाऊस
दरवर्षी पहिला पाऊस
ताज्या करत राहतो त्या
मनात खोलवर रुजलेल्या
पावसासोबत भिजलेल्या
कित्ती नाही म्हटलं तरी
काढतोच वर साठवणीतल्या आठवणी
दरवर्षी पहिला पाऊस
दरवर्षी पहिला पाऊस
आठवण देतो स्वप्नांची
स्वप्नातले घर बांधायची
घर सोडून भटकायची
बीचवर मोठ्या हाॅटेलमध्ये
महागड्या डिश खाण्याची
बोलावतो घरच्यांसोबत चार दिवस
दरवर्षी पहिला पाऊस

