STORYMIRROR

Nandkanya Kulthe

Romance

3  

Nandkanya Kulthe

Romance

रंगात तुझ्या

रंगात तुझ्या

1 min
1.3K

रंगात तुझ्या मी रंगले रे,

प्रेमात तुझ्या मी पडले रे।।ध्रु।।


जग असे सारे जुने,

परी वाटते का नवे।

स्वभावी मी बदलते रे,

तुझ्यात मी विरघळलेे रे।।१।।

रंगात तुझ्या...


तुझीच पडली भूल,

नवस्वप्नांची चाहूल।

प्रितीस करुनी कबूल,

स्वतःच मनी मी लाजले रे।।२।।

रंगात तुझ्या...


करून शृंगार साज,

गालावरची हसरी लाज।

अंतरीच्या या जगात,

तुझ्यासवे भावविश्वी मी नाचले रे।।३।।

रंगात तुझ्या...


पाहुनी या हिरवळीला,

नाजूक मनीस कुरवाळीला।

राधेस श्रीरंग भाळीला,

वेलीसम मीपण बहरले रे।।४।।


रेखली बिंदी माथी,

माळला गजरा सुगंधी।

लुकलुकला झुमका कानी,

तुझ्यासाठी अशी मी नटले रे।।५।।


भेटून पियाला स्वप्नांत,

क्षणिक नजरानजरेत।

अचानक जाग येताच,

झोपेलाच हरवून बसले रे।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance