STORYMIRROR

Nandkanya Kulthe

Others

3  

Nandkanya Kulthe

Others

।। पितृहृदय ।।

।। पितृहृदय ।।

1 min
269


हृदयात असे पित्याच्या

प्रेमाचे निर्मळ झरे

मातेपरी न दाविता

असे सदैव झाकलेले।।ध्रु।।


माथ्यावरती पांघरलेल्या

न संपणा-या गगनाचे।

ध्यान देवूनी एकदा

ऐकावे जी सांगणे।।१।।

हृदयात असे पित्याच्या...।


क्षितिजापाशी झुकलेला

जीवश्रुष्टी गोंजारते।

येता भरूनी कंठा

वृष्टी रूपाने पाझरते।।२।।

हृदयात असे पित्याच्या..।


अमृतमयी सरितेच्या

वात्सल्य पसरे वाहण्याने।

सागरी जरी उथळ लाटा

खोलीत तरंग प्रेमाचे।।३।।

हृदयात असे पित्याच्या...।


श्रुष्टिकर्ता हे विधात्या

पित्यास निर्मिले विचाराने।

भाबडी माय दुबळी पडता

हात खंबीर सावरण्याचे।।४।।

हृदयात असे पित्याच्या...।


श्रीफळापरी कडकपणा

आतून शुभ्र गोड गरे।

कोण मातीचा तो पुतळा

पाहे हित जो लेकरांचे।।५।।

हृदयात असे पित्याच्या...।


सुखदुःखाच्या घटिकेला

आई मोकळी अश्रूने।

पिता तयाला न पाझरता

मळभ ठेवी दाटलेले।।६।।

हृदयात असे पित्याच्या...।


तोच धनश्री या जगा

पितृछत्री सावलीत जगे।

उणीव वाटते मजला

पावलोपावली स्मरत राहते।।७।।

हृदयात असे पित्याच्या...।



Rate this content
Log in