STORYMIRROR

Aarushi Date

Romance

2  

Aarushi Date

Romance

रात ही जगावी...

रात ही जगावी...

1 min
14.1K


मानवले नाही मला, तुझे असे दूर जाणे,

कळतील तुला कधी, भावनांचे अश्रू होणे...

दिवलीमधल्या वाती, पेटवत होता अग्नी,

अंतरात उमटले, विरही शापित ध्वनी...

मिलनाची आस उरे, गुज हे मनीचे दुःखे,

किरणांना समजले, भाव हृदयीचे ते सखे...

क्षितिजावरी उमटती, केशर रंग प्रेमाचे,

जाणशील ना प्रिये तू, इंद्रधनु स्वप्नातले...

साथ तुझीच मिळावी, प्रीती वाटे सजवावी,

नाते बहरू दे आज, वाटे रात ही जगावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance